दुर्मिळ जातीचा बेडूक आढळला

आमणापूरमध्ये दुर्मिळ जातीचा बेडूक आढळून आला आहे. चक्क भिंतीवर चढणारा बेडूक असून स्पायडरमॅन बेडूक म्हणून परिसरात  चर्चेचा विषय ठरला आहे. हा इंडियन कॉमन ट्री प्रजातीचा दुर्मिळ बेडूक असून पांढऱ्या रंगाचा दुर्मिळबेडूक दिसून आला. या बेडकाला झाड बेडूक असेही म्हणतात. हा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. तो नैसर्गिकरीत्या पांढराअसतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो.