आष्ट्यात आज समाजमंदिर इमारतीचे लोकार्पण

आष्टा शहरातील ऐतिहासिक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी १६ मे रोजी होणार आहे. असे आष्टा शहर विकास आघाडीचे वैभव शिंदे यांनी सांगितले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, प्रतिभा पेटारे, विजय पेटारे सुजाता विरभक्त उपस्थित होते. शिंदे म्हणाले, तक्का (समाजमंदिर) लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. बौद्ध समाज बांधवांच्या जडणघडणीत तक्याचे महत्व अनन्य आहे. १२९ वर्षापूर्वी या ठिकाणी शाळा सुरु करण्यात आली होती.पुरातन तक्का इमारतीची पडझड झाली होती, ती दुरुस्तीची मागणी नागरिकांनी माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांच्याकडे केली. शिंदे यांची इच्छा आम. जयंत पाटील यांनी पूर्ण केली. यासाठी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आम. जयंत पाटील यांच्या हस्ते, अर्थशास्त्रज्ञ माजी खा. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तक्का इमारतीचे लोकार्पण होणार आहे.