लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पहिली अनेक पक्षप्रवेश देखील झाले. एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील आणि विकास आघाडीचे तत्कालीन गटनेते विक्रम पाटील एकत्र आले होते. शहाजी पाटील यांनी इस्लामपूर परिसरात गुंडगिरी फोपावली आहे. पोलिसांचा वचक नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर विक्रम पाटील यांनी शहाजी पाटील यांचे मुद्दे खोडून काढले आणि शहरातील अवैध धंदे तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार असताना उदयास आल्याचा पलटवार विक्रम पाटील यांनी केला. तत्कालीन महाविकास आघाडी सत्तेच्या काळात शहरातील गुंडगिरीचा इतिहास काढला असता त्यांचेच बगलबच्चे गुन्हेगारीत दिसतील.
इस्लामपूरमधील गुंडगिरीवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. एम. डी. ड्रग्जसारखे अमली पदार्थ विकले जात आहेत, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावर विकास आघाडीचे तत्कालीन गटनेते विक्रम पाटील यांनी शहरातील गुंडगिरी आणि अवैध धंद्यांचा उगम तत्कालीन महाविकास आघाडीच्या राज्यातच झाला आहे, असा पलटवार केला आहे.
शहाजी पाटील यांनी आमच्या सरकारच्या कारकीर्दीत बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा सबुरीचा सल्ला विक्रम पाटील यांनी दिला. आम्ही कधीही गुंडांना पाठीशी घालत नाही. शहाजी पाटील आणि तुमच्या कार्यकर्त्यांनीच सत्ता काळात काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असेही विक्रम पाटील यांनी आवाहन केले आहे.