आज आमदार जयंतराव पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या कार्यस्थळावर बुधवारी १९ फेब्रुवारीला दुपारी एक वाजता मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याचे पाहुणे म्हणून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आहेत.
इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघात १९ फेब्रुवारीला दुग्ध दिन व महिला मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील यांनी दिली. दूध संघाने २०२५ साली आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्त संघात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दुग्धदिनानिमित्त औषधाविना आरोग्य या विषयावर राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचे औषधाविना आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
विशेष उपस्थिती टीव्ही स्टार मिसेस मुख्यमंत्री फेम व सध्या चालू असलेल्या शिवा मालिकेतील अभिनेत्री अमृता धोंडगे यांची असणार आहे. कार्यक्रमास संघाचे संलग्न प्राथमिक दूध संस्थांचे तसेच तालुक्यातील शेतकरी दूध उत्पादक महिला विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे संघाचे व्हाईस चेअरमन शशिकांत पाटील यांनी सांगितले.