हुपरी ते कागल एमआयडीसी रस्त्यावरील अपघातांमध्ये वाढ, जीव वाचविण्याची नागरिकांमधून मागणी….

सध्या अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली पहायला मिळतच आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे. वेळोवेळी रस्ते दुरुस्तीची मागणी देखील नागरिकांमधून होते पण काही वेळा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत असते. सध्या हुपरी ते कागल एमआयडीसी रस्त्यावर देखील अशीच परिस्थिती पहायला मिळत अहे. हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याच्या समोरून पंचतारांकित औद्योगिक  वसाहतीमध्ये प्रवेश मार्गाला यळगूड आणि हुपरी येथून वळण रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी मध्ये रिंग टाकून गोल सर्कल करण्याची गरज आहे. तर एमआयडीसी मुख्य रस्त्यावर जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वळणदार रस्त्यावर कॅनॉलच्या बाजूला पडलेला खड्डा चुकविण्याच्या नादात छोट्या मोठ्या वाहनांची अपघातांची मालिका सुरू असून खड्डा बुजवून जीव वाचवा, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

यळगूड हुपरी येथून व्यंकटेश सुत गिरणी समोरच्या रस्त्यावर प्रवेश करीत असताना तिकडून इकडे येणाऱ्या वाहनांची दोन्ही बाजूला वळताना चांगलीच कसरत होते. दररोज रोजगाराच्या निमित्ताने हजारो लोक या रस्त्यावरून ये जा करतात तर मोठ मोठ्या उद्योगामुळे बारा चाकी ट्रक इतर मालवाहतूक गाड्या खाजगी वाहने मोठ्या प्रमाणावर जात असतात. वाहतुकीच्या कोंडीला कंटाळलेले व्यापाराच्या निमित्ताने बाहेरून हुपरी शहरात येणारे व कोल्हापूर सराफ बाजारात जाणारे उद्योजक रुग्णवाहिका, अनेक तज्ञ डॉक्टर यांना राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा जवळचा व सोयीचा मार्ग वाटतो मात्र हा प्रवास सुखकारक नाही तर धोकादायक पद्धतीने करावा लागतो.

अंदाजे दहा ते बारा किलोमीटर अंतर असणाऱ्या या ब्रेकर आहेत. रेमंड चौकातून पुढे मार्गावर प्रत्येक किलोमीटरवर स्पीड जाताना पेट्रोल पंपाच्या पुढे डिव्हायडर फोडून पंपाकडे जायला रस्ता केला आहे. तिथे लगेच स्पीड ब्रेकर आहे. यामुळे वळण आणि ब्रेक यातून वाहनधारकांचा बॅलन्स बिघडत असल्याने फार मोठी जोखीम आहे. याकरीता औद्योगिक महामंडळाने स्पीड ब्रेकर हटवून थर्मो प्लास्टिक स्वरूपातील जाड पांढरे पट्टे लावून मध्य मार्ग शोधावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे तर जवाहर साखर कारखान्याच्या समोरून जाणाऱ्या (रिंग रोड ) गोल सर्कल तयार प्रवेश मार्ग तिकीटीवर एक चौक करून वळणाऱ्या वाहन चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांची दिशा कळेल व अपघात रोखण्यासाठी मदत होईल तर कॅनॉलच्या बाजूला पडलेला खड्डा बुजवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.