सांगोला तालुक्यातील १५ मुलींच नेमकं झालं तरी काय ? उत्तराकडे जनतेचे लक्ष

सध्या अलीकडच्या गुन्हेगारी प्रमाणात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. खून, मारामारी तसेच चोरी प्रकरणे वाढली आहेत. तसेच अवैद्य धंदे देखील राजेरोसपणे सुरु आहेत. याला तरुणाई बळी पडत आहे. तसेच अलीकडे मुलींमध्ये असुरक्षित भावना देखील खूपच आहे. मागील वर्षी सांगोला पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या, खून, विनयभंग आणि घरफोडीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. घटनांची अधिक प्रमाणात नोंद झाली आहे.मागील वर्षभरात तर मुली पळून जाण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. मागील वर्षी जानेवारी 2024 ते डिसेंबर अखेर सांगोला तालुक्यातून तब्बल 37 मुली पळून गेल्या होत्या.

त्यातील 22 मुलींचा तपास लागला. मात्र 15 मुलींचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे या 15 मुली गेल्या तरी कुठे? हा प्रश्न तालुकावाशींना पडलेला आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात चोरीच्या तब्बल 128 घटना घडल्या आहेत त्यामध्ये 61 प्रकरणांचा तपास लागलेला आहे मात्र अद्याप 67 घटनांचा तपास बाकी आहे त्यामध्ये 10 गुणांचा तपास लागलेला नाही. केवळ नऊ घटनांमधील मारेकरी पकडले गेले अजूनही दहा फोन करून फरार झालेले मारेकरी मोकाटच असल्याचे दिसून येते. तालुक्यात मागील वर्षभरात तब्बल 37 मुली पळून गेलेल्याआहेत. यातील 22 मुलींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेल आहे. मात्र अजूनही पंधरा मुली कुठे आहेत याचे उत्तर पोलिसांकडून येत नाही. या पळून गेलेल्या मुली दहावी व बारावी परीक्षेच्या वेळी गायब झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे त्याबाबतच्या नोंदी देखील पोलिसांकडे आहेत.

उद्यापासून 11 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि त्यानंतर लगेचच दहावीची परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे पालक आणि पोलिसांनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. या गायब झालेल्या पंधरा मुलींचा तपास लागणार कधी? या मुली कुठे गायब झालेत या मुलींचे नेमकं झालं तरी काय? या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेलं आहे.