हातकणंगलेत आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून व नगरसेवक अभिजीत लुगडे यांच्या पुढाकाराने साडेसहा कोटींच्या विकास कामांना हिरवा कंदील

सद्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. आपापल्या भागाचा विकास करण्यासाठी निधी देखील मंजूर करून आणले जात आहेत. हातकणंगले येथे आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून आणि नगरसेवक अभिजीत लुगडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सहा कोटी पाच लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळाली आहे. नर्मदे गल्ली ते वैभव पाटील घर ते मुजावरकी रोड खडीकरण व डांबरीकरण तसेच वड्यावरील पूल ब्रिज बांधण्यासाठी दोन कोटी सात लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यापूर्वीही माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या 23 -24 च्या निधीतून विविध प्रलंबित कामे पूर्ण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. नगरसेवक अभिजीत लुगडे यांनी हातकणंगले नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून त्यांना संधी द्यावी अशी मागणी मान्यवरांनी केली आहे. या कार्यक्रमाला आमदार राहुल आवाडे नगरसेवक अभिजीत लुगडे आणि ठेकेदार विजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला.