आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुका या काही महिन्यांवरच येऊन ठेपलेल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात करण्यासाठी सत्ताधारी भाजप शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघांमध्ये जोरदार फिल्डींग लावल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या मतदारसंघात विकास कामांना निधी देण्याची घोषणा करून त्याचे उद्घाटनही करण्यास सुरुवात केलेली आहे. विशेषतः भुयारी गटारी योजना, भाजीपाला सुपर मार्केट आदी विकास कामांची उद्घाटन होऊनही योजना पूर्ण झालेल्या नाहीत.
इस्लामपूर आष्टा शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी जयंत पाटील यांनी विविध योजनेतून कोट्यवधी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शहरांना मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा दावा त्यांचे समर्थक करताना दिसत आहेत.
तसेच भविष्यातील विकास योजना जयंत पाटील यांनीच मंजूर करून आणलेल्या आहेत असा दावा त्यांचे समर्थक करतात. त्यामुळे मतदारसंघातील विकास कामांचे भूमिपूजन आणि पूर्णत्वाला आलेल्या कामांच्या उद्घाटनाची घाई झाली आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामे होण्याअगोदरच सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये श्रेयवाद पेटलेला पाहायला मिळत आहे. इस्लामपूर आष्टा शहरात विकास कामावरून श्रेयवाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे.