दि महाराष्ट्र अर्बन फेडरेशनतर्फे एम.डी.पवार बँकेला पुरस्कार

इस्लामपूर येथील एम. डी. पवार पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई कडून सर्वोत्कृष्ट बँक म्हणून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. बँकेतर्फे व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण, संचालक वैभव पवार, तज्ञ संचालक चंद्रकांत खंकाळे, जालिंदर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष आवटी यांनी पुरस्कार स्वीकारला. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण झाले. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या उपाध्यक्ष वैशाली आवाडे, संचालक आम. प्रवीण दरेकर, अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. ९९ वर्षांपासून एम. डी. पवार पीपल्स बँक नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करत आहे. युनिट बँक व १०० कोटी रुपये पर्यंतच्या ठेवी असलेल्या बँकेच्या गटातून सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एम. डी. पवार बँकेला पुरस्कार देण्यात आला. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नागरी सहकारी बँकांच्या कार्याची दखल घेत असते. यात एम. डी. पवार पीपल्स बँकेचा गौरव करण्यात आला.