पक्षाची ताकद वाढवण्याची उद्धव ठाकरेंची सूचना……

आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज व खानापूर आटपाडी या तिन्ही मतदारसंघावर शिवसेना उबाठा गटाने दावा कायम ठेवलेला आहे.

या संदर्भातच मुंबईतील बैठकीत देखील चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या तिन्ही मतदारसंघात मशाल घरोघरी पोहोचवा अशा सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिली आहे.