इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पदाचा खो खो चांगलाच रंगला आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आज सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांनी स्वीकारली. यापूर्वी एकदा या पदावर त्या अल्पकाळ विराजमान झाल्या होत्या. इचलकरंजी महापालिकेतील आयुक्त पदाच्या राजकारण रंगात आले आहे. ओमप्रकाश दिवटे यांची दीड वर्षांपूर्वी महापालिकेचे दुसरे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. तथापि, स्थानिक राजकारणातून या पदावर सातारा जिल्ह्यातील पल्लवी पाटील यांची गतवर्षी ६ डिसेंबर रोजी नियुक्त झाली होती. त्यावर ओमप्रकाश दिवटे यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर पाटील यांच्या नियुक्तीला दुसऱ्याच दिवशी स्थगिती मिळाली. पुन्हा दिवटे यांनी सूत्रे हाती घेतली.
गेल्या आठवड्यात दिवटे यांच्याकडील महापालिकेच्या प्रशासक पदाचा पदभार काढून घेण्यात येऊन ही जबाबदारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर दिवटे यांनी बदलीच्या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत होते. इचलकरंजी येथील महापालिकेचे आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यासाठी त्यांना तब्बल आठ महिने वाट पहावी लागली.
आठ महिन्यांपूर्वी पाटील या महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी दिवटे हे मॅटमध्ये गेले होते. त्यामुळे पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती. दिवटे यांनी मॅटमधून माघार घेऊन गुरूवार दि.१३ पासून दिर्घमुदतीच्या रजेवर गेले आहेत. दिवटे यांनी माघार घेतल्याने शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला.
यापूर्वीचे आयुक्त सुधाकर देशमुख, ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिके घडी बसवली. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. आता पल्लवी पाटील यांनी येथील राजकारणात अडकू नये, सुळकुड पाणी योजना, घनकचरा प्रकल्प, जलकुंभ ही महत्वा कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.