सध्या इचलकरंजी शहरात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी तसेच नागरिकांच्या असंख्य समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण इचलकरंजी शहरातील असे काही वाद आहेत ज्यामुळे या वादाचा विकास कामावर पडत आहे. इचलकरंजी शहराला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वाद नविन नाही. महापालिकेच्या कक्षेत आलेला विकास निधी बहिस्त यंत्रणेकडून करवून घेण्याचा नवा पायंडा लोकप्रतिनिधींकडून सुरू झालेला आहे. याला आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि माजी आ. प्रकाश आवाडे यांच्यातील धुमसत असलेला वाद कारणीभूत असू शकतो.
या नव्या पायंड्यामुळे महापालिकेतील यंत्रणेवरील लोकप्रतिनिधींचा विश्वास उडत चाललेला आहे का? अशी कुजबुज महापालिका वर्तुळात सुरू आहे.माजी आ. प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून शहरासाठी ६ जलकुंभ मंजूर झाले. यासाठी ३१ कोटी रूपयांचा निधीही शहरासाठी मिळाला. परंतू, आवाडे आयुक्त यांच्या वादामुळे या जलकुंभांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आल्याचे कळते. याच बरोबर शहरात रस्ते विकासासाठी ५२ कोटींचा निधी मिळालेला आहे. ही कामेही राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहेत.
हे असच सुरू राहिले तर भविष्यात महापालिकेतील काही विभागांना कुलूप लावण्याची वेळ ओढवू शकते. याचं भान महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाने शहराला महापालिकेचा दर्जा मिळाला.आता त्यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे, त्यांना वेळ नसेल तर त्यांनी जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणून रविंद्र माने यांच्यावरती समन्वयाची जबाबदारी सोपवावी, असेही लोक बोलत आहेत.
