सांगोल्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे स्वागत, मिरवणुकीत हजारो आंबेडकर प्रेमींचा सहभाग

सांगोला तालुक्यात अनेक राजकीय समीकरणे आपण सर्वानी पहिलीच. विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जनतेने आपले मत दिले आणि त्यांची आमदार पदी निवड झाली.  सांगोला शहरात राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन होताच तमाम भीमसैनिकांनी फटाके वाजवून मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सजवलेल्या टेम्पोतून शहरातील मिरवणूक मार्गावरून पुतळ्याची वाजत गाजत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भीमसैनिक, महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. दरम्यान माता भिमाई यांच्या १७१ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने स्मारकाच्या ठिकाणी धम्मविधी भन्तो संबेधी, भन्तो गोविंदो मानदो यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे पूजन केले व त्याच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला.

यावेळी भीमसैनिकांनी जय भीम. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. शेकापचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह सर्वधर्मीय समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब अबिडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.