सध्या अनेक भागात राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु आहेत. त्यामुळे याला तरुणाई बळी पडत आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती देखील वाढत चाललेली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. बनावट दारू तयार करण्यासाठी अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काडापुरे तळ परिसरातून ताब्यात घेतले. अरुण विष्णू शेवाळे (वय ३८ रा. घोडकेनगर) असे त्याचे नाव असून त्याच्यासह विजय भाटले (रा. घोडकेनगर इचलकरंजी सध्या रा. निपाणी) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत २० हजार ४०० रुपये किंमतीचे स्पिरीटचे १७ प्लास्टीकचे कॅन व तवेरा गाडी असा ३ लाख २० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काडापुरे तळ याठिकाणी बनावट दारु तयार करणेसाठी वापरणेत येणारे स्पिरीटचे कॅन भरलेली तवेरा कार येणार असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने काडापुरे तळाकडे जाणारे रोडवर सापळा लावून पांढरे रंगाची तवेरा कार ताब्यात घेतली.
त्यावेळी अरुण विष्णू शेवाळे याचेकडे तवेरा कारमध्ये २० हजार ४०० रुपये किंमतीचे स्पिरीटचे १७ कॅन मिळून आले. अधिक चौकशी करता हे स्पिरीट विजय भाटले (रा. घोडकेनगर इचलकरंजी सध्या रा. निपाणी) याचे मालकीचे तवेरा कारमधून त्याचे सांगणेवरुन बनावट दारु तयार करणेसाठी घेवून जात असलेची कबूली दिली आहे. सदरचे बेकायदेशीर स्पिरीट प्रक्रिया करुन हस्तगत करणेत आले असून दोघांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.