मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. आता एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक समोर आला आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंंभस्नानासाठी जाणार आहेत.
शिवजयंती साजरी झाल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार, खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे.
त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यात आहे. कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे आव्हान देणार आहे. हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे.