Gold Silver Rate Today 18 February 2025 : या आठवड्यात सोन्याची मुसंडी, चांदीत नरमाई, काय आहेत किंमती?

जागतिक बाजारात सध्या ट्रम्प अस्त्राचा मारा सुरू आहे. शरणार्थी, घुसखोर यांना बाहेर काढत असतानाच व्यापार्‍यात अमेरिकन धोरणाचा मोठा परिणाम दिसत आहे. अमेरिका फर्स्ट या धोरणाचे परिणाम जागतिक बाजारात दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजार सोडून सोने आणि चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. परिणामी या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने मोठी मुसंडी मारली. तरी चांदी नरमली. गेल्या आठवड्यात दोन्ही धातुनी दमदार कामगिरी बजावली होती.

सोन्याची पुन्हा घोडदौड

गेल्या आठवड्यात सोन्याने 1200 रुपयांची उसळी घेतली. तर 700 रुपयांनी धातु स्वस्त झाला. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी, सोने 550 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा 1 लाखावर मुक्काम

5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी तितकीच वाढ चांदीत झाली होती. मध्यंतरी आणि नंतर चांदीत नरमाईचे धोरण दिसले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,254, 23 कॅरेट 84,913, 22 कॅरेट सोने 78,093 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,941 रुपये, 14 कॅरेट सोने 49,874 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,946 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.