जादा स्क्रॅप दर व व्याजाचे आमिष दाखवून परप्रांतीय स्क्रॅप व्यावसायिक खान याने शिरोलीतील स्क्रॅप व्यावसायिक व अन्य लोकांना जवळपास पाच कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे. खान या परप्रांतीय स्क्रॅप व्यावसायिक याने शिरोली एमआयडीसीलगतचे अतिक्रमण माळावर स्क्रॅपचे दुकान घातले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी स्क्रॅप गोळा करणाऱ्यांना १९ जणांना वाढीव दराचे आमिष दाखवून स्क्रॅप खरेदी सुरू केला. त्यातून त्याने व्यवसायात मोठी प्रगती केल्याची भासवून गावातील स्क्रॅप व्यावसायिकासह काही संस्थांना गंडा घातल्याची चर्चा आहे. यातील एका संस्थेचे रीतसर कर्ज असल्याने त्यांनी त्याचेवर कारवाई करत तत्काळ त्याची मालमत्ता ताब्यात घेतल्याचे समजते.
याउलट काही लोकांनी नुसत्या साध्या स्टॅम्प नोटरी करत आर्थिक आमिषाला बळी पडत अधिक व्याजाच्या आमिषाने अडकले आहेत. केवळ दोन रुपये जादा दर मिळतोय, या भावनेतून व्यावसायिकानी याबाबत शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजते. त्याने रातोरात आपल्या कुटुंबासह गुजरातला पोबारा केल्याची चर्चा आहे. जाता जाता हे त्याने रोखीने काही रक्कम उचलल्याचे समजते. त्याने सर्व कर्जदारांना तुम्ही घरांकडे या म्हणून सांगून घराला कुलूप लावून पोबारा केला. त्याच्या एकूण रकमेबाबत जरी संभ्रम असला तरी ही रक्कम पाच कोटींच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.