विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना एमपीएडीए (झोपडपट्टी दादा कायदा) नुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा – पाटील यांनी दिले. तसेच विटातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यातून पोलिसांचे एक पथक तयार करून त्याचा अहवाल जिल्हाधिकान्यांनी द्यावा, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत. विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना सूचना दिल्या. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी, चंद्रकांत क्षीरसागर, प्रवीण शिंदे, मोहन राजमाने, तानाजीराजे जाधव, रवींद्र काळेबेरे, गणेश कांबळे, किरण जाधव, अजित झळके, रावसाहेब हजारे, अंजर अथणीकर आदी उपस्थित होते. पत्रकारांवरील हल्ला प्रकरणात अद्याप विनोद सावंत आणि सागर चोथे हे गुन्हेगार अटक झाले नाहीत. उलट त्यांचा अटकपूर्वक जामीनासाठी अर्ज दाखल झाला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना स्थानबद, मोका किंवा झोपडपट्टीदादा कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांच्या कडून करण्यात आली होती.
त्यावर वा हल्ला प्रकरणातील सहाही आरोपींवर एमपीएडीए कायद्यांतर्गत कारवाईच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या. एमडी ड्रग प्रकरणात तपासात विख्यात जे पडले आणि गेल्या काही काळात दोन खून, अपहरण, लुटीच्या घटना, वाढती गुन्हेगारी आणि सहज नशेचे पदार्थ मिळणे लक्षात घेतले तर संपन्न विटा शहरातील जनता अस्वस्थ बनली आहे. त्यासाठी विटातील गुन्हेगारी मोडून काढणारी एक स्वतंत्र टीम जिल्ह्यातून पाठवण्याची मागणी केली, यावर मंत्री पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना आदेश दिले, यापुढे एक पथक यावर नेमण्यात येईल, ज्यावर जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवेल, असेही मंत्री पाटील म्हणाले.