विट्यात चोरट्यांकडून जप्त मोबाईल नागरिकांना परत

विटा पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण २२ मोबाईल राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या मोबाईल हॅण्डसेटचा शोध घेऊन त्यांच्या मुळ मालकांना परत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली. विटा शहर हे सांगली जिल्हयातील व्यापान्याचे दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे आजुबाजुच्या गावांमधुन दररोज नोकरी, शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात.

त्यावेळी प्रयास बाजारपेठ बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार गहाळ झालेल्या मोबाईलवायांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयात एकूण सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे २३ मोबाईल हंण्डसेट मूळ मालकाला परत केले.पो. नि. शब्द मेमागे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत, विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस कॉनटेबल उत्तम माळी, अमोल काळे, हेमंत रिवाल, प्रमोद साखरपे ,महेश संकपाळ, संभाज देशमुख, अक्षय जगदाले पथकान को दमदार कामगिरी केली.