भविष्यातील बदलते तंत्रज्ञान हेच भारताच्या प्रगतीची दिशा ठरवणार असून द्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून भारतातील ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले. इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या आंतराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमचे उदघाटन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी आणि नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. आरआयटी महाविद्यालयामध्ये सुरु असणारे उपक्रम या ग्रामीण भागाला जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देऊ शकतात. राजारामबापूच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना ना. गडकरींनी सांगितले कि कोणत्याही व्यक्तरीचे नेत्र दान करता येतात, पण दूरदृष्टी दान करता येत नाही.
आज आरआयटी सारख्या महाविद्यालयातून विद्याथ्यांना दूरदृष्टी देण्याचे काम चालू आहे हे पाहून आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक ही भविष्यातील पिढीला निर्माण करण्याकरता होणारा खर्च आहे. तसेच ज्ञानाचे रूपांतर संपत्तीमध्ये करणे हेच भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जयंत पाटील आणि भगतसिंह पाटील या भागातील विद्यार्थ्यांना या संस्थेच्या मार्फत ज्ञान घेण्याची संधी देत आहेत. जगातील सर्वात युवक प्रशिक्षित अभियांत्रिकेची पदवी असणारे मनुष्यबळ फक्त भारतामध्ये आहे ज्याच्यामुळे आपण भविष्यात जगावरती राज्य करू शकतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले कि, आरआयटी महाविद्यालयाच्या बेचाळीस वर्षांच्या जडणघडणीत अनेक मैलाचे दगड पार केला आहे. भारतामधील पहिल्या शंभर संस्थांपैकी एक ही अभियांत्रिकी संस्था आहे. ते म्हणाले भारताचा जागतिक पातळीवर चेहरा मोहरा बदलणारा एकमेव नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. तसेच जे नाविन्यपूर्ण आणि भविष्याचा वेध घेणारे आहे त्याला गडकरी साहेबांचा पाठिंबा असतो असे सांगितले.