येत्या काळात उद्योगात स्पर्धा जीवघेणी होणार आहे. त्यासाठी आपले ध्येय स्पष्ट असले पाहिजे. आपला व्यवसाय करण्यामागील “का?” हे कारण स्पष्ट असला पाहिजे, नकारात्मकता आपला व्यवसाय अडचणीत आणू शकते. इस्लामपूर बिझनेस फोरम येत्या काळात मोठा व होईल आणि उद्योजकीय क्षेत्रात दिशादर्शक ठरेल. असे आ. सत्यजित तांबे म्हणाले. सांगली जिल्ह्याच्या पाण्यात शून्यातून विश्व उभारण्याची जिद आहे. इस्लामपूर बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित बिझनेस एक्स्पोमध्ये उद्योजक हाच आर्थिक विकासाचा कणा या विषयावर ते बोलत होते. आयबीएफचे संस्थापक प्रतीक पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. संदेश व वृषाली पाटील, सतीश सूर्यवंशी, प्रीतम सांभारे, आरजे ओंकार चिटणीस यांचा सत्कार करण्यात आला. आजचा युवक हाच देशाचे भविष्य आहे. मध्यम आणि लघु उद्योग हेच आपल्या देशाचे बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी मार्ग ठरेल. सुशिक्षित सर्वांनाच रोजगार मिळू शकत नाही, त्यामुळे या क्षेत्राकडूनच जास्त अपेक्षा आहेत. अलीकडे उद्योजक होण्याची पॅशन झाली. उद्योगात नावीन्य, वेगळेपण हवे तरच यश शक्य आहे. उद्योग, कर्जाच्या योजनासाठी आर्थिक साक्षरता आवश्यक आहे, असे आ. सत्यजित तांबे म्हणाले.