माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या पाठपुराव्याने जलतरण तलावाचे नूतनीकरण पूर्ण …..

इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे सुरु आहेत. ज्यामुळे शहराच्या विकासात भर पडत आहे. इचलकरंजी शहरातील जलतरण तलावाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर तो नागरिकांच्या सेवेत खुला करण्यात आला. या उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी मक्तेदार हणमंत चव्हाण, कृष्णात तोरसकर, सुशांत कोटगी, अशोक म्हामणे, सुभाष स्वामी, गंगाराम बरगे, उदयसिंह निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यासाठी माजी नगरसेवक सागर चाळके यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे उपस्थित सभासदांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जलतरण तलावाच्या नूतनीकरणामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.