आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले पंचकल्याणक महोत्सवाचे आमंत्रण

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे एक ते नऊ जानेवारी या कालावधीमध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे आणि याच महोत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सागर बंगला निवासस्थानी भेटून महोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करत या धार्मिक महोत्सवास उपस्थित राहण्यासाठीचे आमंत्रण दिले. त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करत महोत्सव कालावधीत येण्यास सकारात्मकता दर्शवलेली आहे.