कोल्हापुरातील गोखले कॉलेज चौकात साकारला तब्बल 21 फुटी शिवरायांचा पुतळा; पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी मूर्ती

काल सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गावोगावी गल्लोगल्ली मिरवणूका काढण्यात आल्या. एकच उत्साह जल्लोष पहायला मिळाला. दरम्यान,कोल्हापुर शहर शिवमय झाले असून, शिवज्योती नेण्यासाठी सकाळपासूनच पन्हाळगडावर गर्दी झाली आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ, मिरजकर तिकटी येथील मावळा फाउंडेशनतर्फे गेले चार दिवस विविध उपक्रम सुरू आहेत. त्याचवेळी शहरातील इतर पेठांसह उपनगरातही शिवजयंतीचा मोठा माहोल पहायला मिळत आहे.१९) सर्वत्र शिवजयंती साजरी होत आहे.

दरम्यान, शहर शिवमय झाले असून, शिवज्योती नेण्यासाठी सकाळपासूनच पन्हाळगडावर गर्दी झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ, मिरजकर तिकटी येथील मावळा फाउंडेशनतर्फे गेले चार दिवस विविध उपक्रम सुरू आहेत. त्याचवेळी शहरातील इतर पेठांसह उपनगरातही शिवजयंतीचा मोठा माहोल पहायला मिळत आहे. गोखले कॉलेज परिसरातील गोखले कॉलेज चौक शिवजयंती उत्सव समितीतर्फे यंदा कायमस्वरूपी २१ फुटी फायबरची मूर्ती तयार केली आहे. मूर्तीसाठीचे मातीकाम ओमकार आर्टसने केले असून, फायबर मूर्तीचे काम गोकुळ शिरगाव येथील प्रणित फायबर वर्क्सने केले आहे.

‘प्रणित”चे पांडुरंग भोसले यांनी यापूर्वी महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, अण्णा भाऊ साठे, गौतम बुद्ध आदी महामानवांचे पुतळे तयार केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची फायबरची २१ फुटी मूर्ती पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच तयार झाली असल्याचे ते सांगतात.