शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार: ब्रह्मानंद 

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणीच व्हावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची मार्गदर्शनाखाली विद्यापीठ कृती समितीला बरोबर घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन याबाबतचा मार्ग काढू अशी ग्वाही सांगली जिल्हा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर येथे झालेल्या बैठकीत बोलताना दिली यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे सांगली जिल्हा सहकार विभागाचे अध्यक्ष दाजी भाऊ पवार खानापूर नगरपंचायत विरोधी पक्ष नेते राजेंद्र माने गटनेते मारुती भगत नगरसेवक सुहास ठोंबरे यशवंत तोडकर धोंडीराम माळी यांचे सह विद्यापीठ चळवळ कृती समितीचे अक्षय भगत विठ्ठल भगत ऋषी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. 

त्यावेळी बोलताना ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की खानापूर आटपाडी तासगाव कवठेमंकाळ कडेगाव या कायम दुष्काळी असलेल्या भागांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होणे गरजेचे आहे यामुळे भौगोलिक विकास होण्यास मदत होईल आमदार गोपीचंद पडळकर हे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला व्हावे यासाठी विद्यापीठा सहित विधान परिषद आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवत आहेत त्यामुळे गोपीचंद पडळकर हे शिवाजी विद्यापीठाची उपकेंद्र खानापूरला खेचून आणतील असा ठाम विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की विद्यापीठ उपकेंद्रासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.