सद्या अनेक भागात गुन्हेगारीच्या प्रकारात वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. तसेच महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना देखील निर्माण झालेली आहे. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील कामगार महिलेचा विनयभंग तिच्या कंपनी मालकाने केल्याची तक्रार पीडित महिलेने वडगाव पोलिसांत केली आहे. याबाबत वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसातून तळसंदे येथे अजित ऑरगॅनिक फार्मिंग प्रा. लि. कंपनी ही अजित शामराव वडर (वय ३९) याने सुरू केली आहे. त्याच्या कंपनीत तक्रारदार महिला कामगार म्हणून नोकरीला आहे. अजित याने सुमारे सहा महिने वारंवार विनयभंग केला असल्याची तक्रार संबंधित महिलेने वडगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.