सद्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने अनेक ठिकठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आलेल्या आहेत. सांगोला तालुक्यातही पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होते. हिंदुहृदयसम्राट साहेब प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सुत्रानुसार व हिंदू महानायक शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या सामाजिक उपक्रम राबविण्याच्या शिकवणूकीतून दरवर्षी प्रमाणे उन्हाळ्याची तीव्रता बघून सांगोला महुद रस्त्यावरील प्रवाशांची तहान भागवून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने हिंदुहृदयसम्राट साहेब प्रतिष्ठान ढाळेवाडीचे अध्यक्ष, शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी व सचिव मुख्याध्यापक अनिल बनसोडे तसेच शिवसेना शाखाप्रमुख सचिन सुरवसे यांच्या सौजन्याने प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन महुदचे माजी सरपंच मा बाळासाहेब ढाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सांगोला महुद रस्त्यावरील प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे पाणपोई सुरु
