हातकणंगले येथील ग्रामीण रूग्णालयाच्या पाठीमागे भारतनगर मध्ये भरदिवसा दुपारी बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून कुलुप तोडून धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. एक तोळा सोने २० ग्रॅम चांदी व रोख रक्कमेसह अंदाजे ९० हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
याबाबतची फिर्याद खंडेराव देशपांडे यांनी हातकणंगले पोलीसात दिली आहे.याबाबत अधिक माहीती अशी कि, हातकणंगले येथील खंडेराव देशपांडे हे पत्नीसह दुपारी एक वाजता पेठाभाग येथे गेले असता गेटचे कुलुप न तोडता मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील कपाट फोडून एक तोळा सोने, २० ग्रॅम चांदी व पर्समधील रोख रक्कमेसह अंदाजे ९० हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.
दिवसाढवळ्या चोरी झाल्याने हातकणंगले पोलीसांसमोर मोठे तपासाचे आव्हान असून चोरटे हे माहीतगार असलेचे बोलले जात आहे. यापुर्वी अशीच चोरी देशपांडे यांच्या घरी झाली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.