छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी हुपरी शहर यांच्यातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते नववी अशा दोन गटांमध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली. मोठ्या गटामध्ये प्रथम – कु. शुभ्रा मंजुनाथ पोतदार, द्वितीय क्रमांक कु. संस्कृती अमर पोतदार व तृतीय क्रमांक कु. श्रावणी तेजस बाबर व लक्षदीप अमोल हुलवान या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ७०१रु, ५०१रु, ३०१रु असे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
लहान गटामध्ये प्रथम क्रमांक कु. वरद अनिल पौंडकर, द्वितीय क्रमांक कु. राधिका संतोष जगदाळे व तृतीय क्रमांक कु. अवधूत दीपक काळे व प्रणाली दीपक धोंगडे या विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५०१ रु.३०१.२०१रु बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हुपरी वंचित आघाडी प्रमुख पांडुरंग मानकापूरे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव संघमित्रा, सागर कांबळे, प्रशांत दाभाडे, भरत मानकापुरे, अक्षय फुले, सौ. महादेवी मिठारी उपस्थित होते.