हुपरीसह जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वादळ निर्माण करत शिवसेनेचा झंजावात गावोगावी पोहोचविण्यात गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. मुरलीधर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर हुपरी परिसरातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे.
त्याच अनुषंगाने हुपरी व रेंदाळ येथील उबाठा गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी गोकुळ दूर संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते प्रवेश केला.