पुलाची शिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दत्तात्रय सुतार यांची देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कोल्हापूर जनता सेंट्रल को-ऑप कंझ्यूमर स्टोअर्स लि. कोल्हापूरच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. सुतार या संस्थेची सन २०२५- २०३० ची पंचवार्षिक निवड आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. यामध्ये शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांचे कट्टर समर्थक असलेले राजू सुतार यांना पुलाची शिरोलीतून पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
या निवडीसाठी आमदार सतेज पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तर शशिकांत खवरे, उत्तम पाटील, शिवाजी पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. या निवडी प्रसंगी मानसिंग गावडे, नाना उलपे, शिवाजी पाटील, प्रल्हाद खोत, अतुल शिंदे, कपील सावंत आदी उपस्थित होते.