इचलकरंजीचा पाणी पुरवठा विस्कळीत;कृष्णेला पुन्हा गळती

इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला शिरढोण येथे पुन्हा गळती लागली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत होणार आहे. पाणी पुरवठा योजनेला गती लागण्याचे चिन्हे दिसत नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी इतरत्र आधार घ्यावा लागणार आहे. इचलकरंजी शहराला मजरेवाडी येथील कृष्णा नळपाणी पुरवठा योजना व पंचगंगेतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. मजरेवाडी कडून येणारी जुनी पाण्याच्या दाबनलिकेस शनिवार शिरढोण गावानजिक पाटील यांचे घराजवळ पाईपलाईला गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहरास होत असलेला पाणी पुरवठा शनिवार सांयकाळपासून तातडीने बंद करणेत आलेला आहे. 

या ठिकाणची गळती काढणेचे काम महानगर पालिकेच्या बतीने तातडीने हाती घेणेत आल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार असल्याने शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. या पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणी साठा जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.