हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी

हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे श्री काडसिद्धेश्वर भजनी मंडळ नागाव व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाशिवरात्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त बुधवार दि. २६ रोजी सकाळी श्री महादेवास अभिषेक व शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण व रात्री श्री काडसिद्धेश्वर भजनी मंडळ नागाव यांचा शिवजागर कार्यक्रम पार पडला. तसेच गुरुवार दि.२७ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ सुमारे ५ हजार भाविकांनी घेतला. तसेच या प्रसादाच्या ठिकाणी बॉडी हेल्थ चेक अप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. नागाव शिवाजी चौकातील महादेव मंदिर व नागाव फाटा येथील महादेव मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.