इचलकरंजीत कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यानची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद! प्रवाशातून नाराजीचा सूर

सध्या अनेक भागात विविध आंदोलने, मोर्चे काढण्यात येत आहेत. वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हि आंदोलने काढली जातात. कर्नाटकमध्ये महाराष्ट्र कंडक्टरला झालेल्या मारहाणीनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यानची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. याचा थेट परिणाम इचलकरंजी बसस्थानकावर झाला असून कर्नाटक कडे जाणाऱ्या सर्व फेऱ्या रविवारी रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागला.

 इचलकरंजी बस स्थानकात दररोज कर्नाटकातून मुक्कामासाठी सु रे २५ बसेस येतात तर दिवसभरात निपाणी, चिक्कोडी, बागलकोट बेळगाव, रायबाग, कलबुर्गी होस्पेट , यादगीर, गंगावती,हुबळी, धारवाड, दावणगिरी,उळवी, इंडी, म द्देबिहाळ, जमखंडी, बळ्ळारी गुळेदमुड्ड आदी ठिकाणी शंभर हून अधिक फेऱ्या होतात, यापैकी कोणत्याही मार्गावर येथील बस स्थानकातून बस धावले नाही त्यामुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागतो याचाच फायदा घेत इचलकरंजी बोरगाव मार्गावर वडाप वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी प्रवाशांची चांगलीच आर्थिक लूट केली. दररोज वीस ते पंचवीस रुपये घेणाऱ्या या प्रवासासाठी रविवारी वडाप चालकांनी ५० ते ६० रुपये घेत आर्थिक लूट चालवली होती त्यामुळे प्रवाशातून नाराजीचा सूर उठत होता.