सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कायद्याचा धाक वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला आहे.या टास्क फोर्समध्ये सहा पोलिस उपअधीक्षकही असतील.
दरम्यान, विटा ड्रग्जप्रकरणी सर्व गुन्हेगारांना मकोका लागेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.