विट्यात मोठ्या जल्लोषात खो – खो अजिंक्य पदाचा थरार

महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या खेळात खेळाडू नैपुण्य मिळवत आहेत. महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहचत असल्याचे चित्र दिसत आहेच. सध्या प्रत्येक गावोगावी अनेक स्पर्धांचे आयोजन देखील केले जाते. विट्यात देखील खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पुरुष गटातील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेच्या सुरुवातीलाच विट्यातील राष्ट्रीय महिला खो-खो खेळाडूंचा माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील निमंत्रित 12 संघात मोठ्या सुरशीने सामने झाले. अंतिम सामन्यात कवठेपिरानच्या हिंदकेसरी संघाने कुपवाडच्या राणा प्रताप संघावर एक गुण आणि दीड मिनिट राखून विजय मिळवत जिल्हा अजिंक्य पदाचा चषक पटकावला. तर कुपवाडच्या राणा प्रताप संघाने उपविजेतेपदाचा चषक पटकावला.
कवठेपिरानच्या हिंदकेसरीच्या विजेता संघाला दहा हजार रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते विजेता संघांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत विटातील माजी राष्ट्रीय महिला खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आहे