दोन्ही भाऊंनी विधानसभेला राजेंद्र अण्णांना पाठिंबा द्यावा; ब्रह्मानंद पडळकर

आटपाडीचे माजी आ. राजेंद्र अण्णा देशमुख यांनी विद्यमान आ. अनिल बाबर व माजी आ.सदाशिवराव पाटील यांना दोन वेळा पाठिंबा दिला होता.

त्यामुळे आता या दोन्ही भाऊंनी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना पाठिंबा देऊन आटपाडीचा आमदार करावा अशी मागणी माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केली आहे.

खानापूर मतदार संघातील विसापूर सर्कल आणि विटा परिसरात माजी सभापती पडळकर यांनी भाजपची गाव भेट मोहीम सुरू केली आहे. यानिमित्त पडळकर यांनी विटा येथे आल्यानंतर संवाद साधला.