मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा एसटी कर्मचारी संपला पाठिंबा!

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असले तरीही अहोरात्र काम करत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आजकालच्या या महागाईच्या जीवनामध्ये अगदी कमी वेतनावर अहोरात्र एसटी कर्मचारी काम करत आहेत. त्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवे वेतन मिळावे अशी रास्त मागणी त्यांची असताना त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सतत महामंडळ हे तोट्यात आहे असे कारण पुढे देत आहेत. सातवे वेतन देऊन एसटी महामंडळाचे खूप मोठे नुकसान होणार नाही.अलीकडे अनेक योजनांच्या माध्यमातून सरकार हे चार कोटींचा निधी एसटी महामंडळाकडे देत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ हे अलीकडच्या काळात तोट्यात न राहता नफ्यात असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे अहोरात्र काम करणाऱ्या या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण व्हावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांचा आत्मविश्वास वाढवणार त्यांच्या या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देईन असे मत मा. आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. प्रसंगी चक्काजाम करण्याची जरी वेळ आली तरी मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया मा. आम. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दिली आहे.