सध्या सांगोला तालुक्यात माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा सुरू झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी कालच म्हणजेच रविवार पासून सांगोला तालुक्यातील वाड्यावर तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याला पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद नागरिकांकडून मिळालेला आहे.
त्यांनी पहिल्याच दिवशी म्हणजेच काल रविवारी सात जुलैला कोळा परिसरातील गाव भेट दौरा केला. कराडवाडी, कोंबडवाडी, मदनेवस्ती, माळेवाडी, गुंडाळवस्ती, ई, बोधगिरे वस्ती या वाड्यावस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी प्रश्न जाणून घेतले. आबांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता गोळा परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे ऑन द स्पॉट निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
दीपक आबांनी कोळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे आणि ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. कोळा परिसरातील वाड्यावस्त्यांवर दीपक आबांचे उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. आबांच्या या दौऱ्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
प्रत्येक ठिकाणी महिलांनी औक्षण करून आबांचे स्वागत केले आणि आपल्या अडीअडचणी मांडल्या. आबांनी जागेवरच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या समस्या सोडवल्या. तसेच महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले.