इचलकरंजी येथे ई – बस डेपो बांधकामाची आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून पाहणी

इचलकरंजी महानगरपालिका परिवहन व्यवस्थेसाठी महानगरपालिकेस २५ ई – बसेस आणि त्यासाठी पायाभूत सुविधांसाठी ९.८९ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी महानगरपालिका च्या मालकीची आरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याठिकाणी चार्जिंग स्टेशन आणि ई – बस डेपो इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामाची आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहापूर येथे जागेस भेट देऊन सर्व पाहणी केली. 

केंद्र सरकारच्या पीएम बस चार्जिंग सेवा अंतर्गत असलेले काम गुणवत्तापुर्वक आणि मुदतीत पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित विभाग प्रमुख यांना दिल्या. यावेळी प्र.नगर अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे, प्र. विद्युत अभियंता इसरार बेग हे सर्व उपस्थित होते.