आष्टा येथे आण्णाभाऊंचा पुतळा,स्मारक व्हावे अशी मागणी

आष्टा शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक व्हावे, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्त्वाखाली व आष्टा शहर उपाध्यक्ष अमोल लोखंडे यांच्या पुढाकाराने आष्टा अप्पर तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन अप्पर तहसिलदार राजशेखर लिंबारे यांना देण्यात आले आईच. यावेळी बोलताना डॉ. सुधाकर वायदंडे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रचळवळीत साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान आहे.

छ. शिवाजी महाराज यांचा पोवाडा पहिल्यांदाच देशाबाहेर जाऊन रशियामध्ये आण्णाभाऊंनी आंदोलन छेडण्यात येईल. मातंग समाजाची अस्मिता असणाऱ्या व जन्मभूमी असलेल्या वाळवा तालुक्यात आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नाही, ही निषेधार्थ बाब आहे. तरी प्रशासनाने पुतळा व स्मारकाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात आले.