इस्लामपूर येथील जय हनुमान नागरी सह पतसंस्थेच्या शाखा मार्केट यार्डचा स्थलांतर समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचे हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी दि २ मार्च २०२५ रोजी सायं ५:३० वाजता आयोजित केलेचे संस्थेचे कुटुंबप्रमुख शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. जय हनुमान पतसंस्था गेली ४४ वर्षे सर्व सामान्य ग्राहकाबरोबरच बॅकींगच्या आधुनिक सुविधांसह इस्लामपूर व परिसरात काम करत आहेत. संस्थेच्या आजअखेर ९१ कोटी ठेवी अजून कर्ज वितरण ७६ कोटीचे आहे. संस्थेचा स्वनिधी ९.९० कोटी असून गुंतवणूक रू ३०.०० कोटी आहे.
संस्थेत विविध प्रकारच्या कर्ज योजना असून बॅकींग सुविधामध्ये कोड मिनी व मोबाईल बँकींग सुविधा उपलब्ध आहेत. याचा ग्राहक नेहमीच लाभ घेत आहेत. सर्वसामान्य लोकांपासून मोठया व्यापाऱ्यापर्यंत सर्व प्रकारच्या कर्ज योजना सुरू आहेत. संस्थेची स्वमालकीची सुसज्ज तीन मजली इमारत आहे. तसेच संस्थेत सेफ डिपॉझीट लॉकरचीही सुविधा आहे. संस्थेच्या शाखा मार्केट यार्डमध्ये देखिल रु १५ कोटी ठेवी असुन कर्ज वाटप ८ कोटी पर्यत आहेत. संस्था नेहमीच ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहिली असून संचालक मंडळाने दिलेली ध्येयधोरणे कर्मचाऱ्यांकडुन प्रभाविपणे राबविली जात आहेत. यामुळे संस्था नेहमीच प्रगतीपथावर आहे.