खानापूर मतदारसंघातील ४६ गावांचा…….

खानापूर आणि आटपाडी तालुक्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली. खानापूर विधानसभा मतदारसंघातील ४६ गावांचा डोंगरी विकास योजनेत समावेश करण्यात आला आहे. यात खानापूर तालुक्यातील १७, आटपाडीतील २०, तर विसापूर मंडलातील ९ गावांचा समावेश आहे. तसेच ते म्हणाले, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा फायदा होणार आहे.

शिवाय डोंगरी विकास योजनेतून विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे. डोंगरी विभागात समाविष्ट गावे
खानापूर तालुका : बेणापूर, धोंडेवाडी, भूड, घोटी खुर्द, मादळमुठी, भडकेवाडी, हिवरे, जाधववाडी, बलवडी (खा.), मेंगाणवाडी, लेंगरे, ऐनवाडी, नवाडी, पारे वासुंबे, देविखिंडी, रेवणगाव, पळशी, रेणावी, घोटी बुद्रुक, ताडाचीवाडी, कुर्ली आणि बाणूरगड.

आटपाडी तालुका : औटेवाडी, कामत, कानकात्रेवाडी, चिंचाळे, घरनिकी, घाणंद, विभूतवाडी, जांभुळणी, धावडवाडी, नेलकरंजी, पारेकरवाडी, पिंपरी बुद्रुक, मुडेवाडी, वाक्षेवाडी, वलवण, बाळेवाडी, मानेवाडी, मिटकी, तळेवाडी, हिवतड.
विसापूर मंडल : विजयनगर, पेड, कचरेवाडी, गौरगाव, धामणी, धोंडेवाडी, मोराळे, पाडळी, नरसेवाडी, किंदरवाडी, मोराळे (पेड).