विट्यात आज दिव्यांगांच्या शिबिराचे आयोजन 

विटा येथे आज दिव्यांगांसाठी बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात देण्याचे शिबिर आयोजित केल्याची माहिती डॉ. मानाजी कदम यांनी दिली. डॉ. मानाजी कदम म्हणाले, बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात पश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत. विटा येथील केमिस्ट भवन येथे या शिबिराचे आयोजन केले आहे.