श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे मराठी विभागातर्फे थोर साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार मेघाताई पाटील उपस्थित होत्या. संयोजन प्रा. विजय शिंदे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शहाजी पारसे यांनी केले. यावेळी प्रा. गणपतराव नांगरे, डॉ. संजय सपकाळ, दिनेश देशमुख, अनिता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली.
यानंतर मेघाताई पाटील यांनी ‘मराठी भाषेचे महत्त्व आणि साहित्य निर्मिती प्रक्रिया’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. वाचन संस्कृती वाढली पाहिजे, कारण वाचनातूनच माणूस घडतो. मराठी ही मनाची भाषा असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार मेघाताई पाटील यांनी व्यक्त केले. विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही केले. अध्यक्षीय मनोगतात शिवाजीराव भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांनी सातत्याने मराठी वाचन, लेखन करणे गरजेचे आहे. यासाठी उत्तम मोटे, डॉ. संदीप विभुते, सुजाता देशमुख, उज्ज्वला शिंदे, कृष्णा खिलारी, राजू पवार, पांडुरंग धादवड, गणेश लिंगे, तानाजी देशमुख, नवनाथ जाधव उपस्थित होते.
