प्रतिवर्षीप्रमाणे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या अष्टमी उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. काल (गुरुवार) या यात्रेच्या मुख्य दिवशी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास श्रींच्या छबिना आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ, रेवणसिध्द, म्हसवडसिध्द, भैरोबा या चार देवांच्या पालखींच्या मिरवणूकीस मानकर्यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. मिरवणूकीच्या अग्रभागी हत्ती, घोडे, बँड पथक आणि पारंपारिक वाद्य पथके सहभागी झाले होते. उभ्या पेठेतील मारूती मंदिरापासून मिरवणूकीस प्रारंभ झाला.
विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त श्रींची छबिना आणि पालख्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी नाथ बाबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात गुलाल उधळण्यात आला.तसेच गुरुवारी मध्यरात्री नयनरम्य शोभेच्या दारूची अतिषबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.