हुपरी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाची माहिती रितसर मागितली असता दिली जाईल असा पवित्रा घेणाऱ्या नगर अभियंत्याला एका माजी नगरसेवकांने दमदाटी करून अरेरावीची भाषा केली आहे. लिपिक शुभम काशीद यांना जीवे मारण्याची धमकी दिले प्रकरणी संशयीत आरोपी सुभाष बंडू कागले (वय ५२ रा. राजगुरुनगर हुपरी) यांच्यावर नमूद केलेप्रमाणे हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल झाला आहे. या घटनेने बांधकाम विभागातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २८ फेब्रुवारी रोजी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली.
संशयीत आरोपी सुभाष कागले बांधकाम विभागात येऊन बांधकाम विभागातील संबंधित कागदोपत्रांची मागणी केली असता रितसर अर्ज करुन कागदोपत्रांची मागणी करा असे सांगितले मात्र, संशयीत आरोपीने दमदाटी भाषा करुन नगर अभियंता देसाई यांच्या हातातील मोजमाप पुस्तिका हिसकावून घेत टेबलावर आपटून गोंधळ घातला व कुठे काय करायचे ते करा नाहीतर गुन्हा दाखल करा असे धमकावले व लिपिक शुभम काशीद यांना तात्काळ कागदपत्रे दे नाहीतर बाहेर ये तुझे हातपाय तोडण्याची भाषा केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
नगरपरिषद कार्यालय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी दिले प्रकरणी प्रदिप पांडुरंग देसाई ( वय ३१ रा. राजारामपूरी कोल्हापूर) यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलिस ठाण्यात नमूद कलमाप्र गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातील राजकीय वातावरणात उमटले असून हुपरी पंचक्रोशीत या अर्थपुर्ण घडामोडींची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अधिक तपास पीएसआय प्रसाद कोळपे करीत आहेत.