शिवजयंतीनिमित्त आष्ट्यात होणार शिलाई मशिनचे वाटप!

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने गावोगावी अनेक कार्यक्रम यांचे आयोजन केले जातात. असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आष्टा येथे होणार आहे. शिवजयंतीनिमित्त आष्टा शहर शिवसेनेतर्फे शहरातील निराधार विधवा महिलांना मोफत शिलाई मशिन वाटपाचा विधायक कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली.

सोमवार म्हणजेच दि. १९ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात खा. धैर्यशिल माने, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे..