सांगोला तालुक्यात दोन वर्षांनी ७५ हजार शेतकऱ्यांना मिळाला दुष्काळनिधी

दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. पण आता या टंचाईवर मात होतानाचे चित्र दिसत आहे. खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी मंगळवार अखेर सांगोला तालुक्यातील ७५ हजार ९४६ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ११६ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांचा दुष्काळनिधी जमा केला आहे.दोन वर्षापूर्वी सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी १५७ कोटी ७ लाख ६७ हजार रुपयांचा इतक्या रकमेची तरतूद केली होती.

आतापर्यंत ७६ हजार ९२४ बाधित शेतकरी खातेदारांच्या ११९ कोटी १६ लाख ३४ हजार ५८३ रुपयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. ५ लाख ४१ हजार ६७५ रुपयांचा निधी प्रलंबित आहे. ३४ खातेदारांची ई-केवायसी झाल्यानंतर निधी प्राप्त होणार आहे. आजअखेर ७५ हजार ९४६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११६ कोटी २६ लाख २९ हजार ५३ रुपयांचे दुष्काळ अनुदान जमा आहे.