सांगोला तालुका रेडियम व डिजीटल प्रिंटींग व्यावसायिकांची बैठक संपन्न; हजारो कुटूंबावर ऊपासमारीची वेळ

सांगोला तालुका रेडियम व डिजीटल प्रिंटींग व्यावसायिकांची राजमाता जिजाऊ उद्यानात सांगोला येथे बैठक पार पडली. त्यामध्ये शासनाने सध्या सर्व प्रकारच्या वाहनांकरिता हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लागू केल्या आहेत त्यावर सर्व व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयामुळं हजारो कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी एकप्रकारे त्यांचे व्यवसायचं काढुन घेतले आहेत. त्यामुळे बेरोजगारीत भर पडणार आहे. या निमित्ताने तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याचा ठराव घेण्यात आला. 

मायबाप सरकारला विनंती आपण स्थानिकांची रोजीरोटी हिरावून न घेता त्या व्यावसायिकांना काही नियम व अटी लागू करून त्यांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बनविण्यास मंजुरी द्यावी. त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास कमी होईल यासह हजारो कुटूंब ऊघड्यावर पडण्यापासून वंचित राहतील. स्थानिकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची भावना सरकारकडे पोहचविण्याकरिता चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी सांगोला शहर व तालुक्यातील रेडियम व डिजीटल प्रिंटींग व्यायसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.